मीडिया
मीडिया : मीड लोकांची मूळ भूमी आणि वायव्य इराणच्या भूप्रदेशाचे प्राचीन नाव. वायव्य इराण आणि रशियाचा कॅस्पियन समुद्राजवळचा नैर्ऋत्य भाग मिळून जो भूप्रदेश होतो, तो प्राचीन काळी मीडिया या नावाने ओळखला जाई. उत्तरेला उर्मिया सरोवर, पश्चिमेला झॅग्रॉस पर्वतरांगा आणि पूर्वेला एल्बूर्झ पर्वत यांनी तो सीमांकित होता.